पिंपरी (Pclive7.com):- शाश्वत शहरी जीवनाच्या दिशेने पाऊल टाकत, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) आणि बीवायसीएस इंडिया फाऊंडेशनच्या सहकार्याने पर्यावरणपूरक वाहतुकीच्या भविष्याला आकार देण्यासाठी राष्ट्रीय सायकल मेअर कार्यशाळा नुकतीच ग.दि.माडगूळकर सभागृहात पार पडली. यामध्ये, देशभरातील सायकल मेअर यांनी सहभाग नोंदवून सायकलिंगच्या पायाभूत सुविधा बाबत विचार मांडून मंथन केले.
यावेळी, स्मार्ट सिटी मिशन डायरेक्टर कुणाल कुमार, महापालिका आयुक्त शेखर सिंग, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, सहशहर अभिंयता प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, सायकल मेअर आशिक जैन, बीवायसीएस इंडिया फाउंडेशनच्या डॉ. भैरवी जोशी, मातृश्री शेट्टी यांच्यासह शहरी नियोजक, वास्तुविशारद, महानगरपालिका अधिकारी आदींनी या चर्चेत सक्रियपणे सहभाग नोंदविला.
पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सायकलिंगच्या पायाभूत सुविधांबाबत विचारांच्या देवाणघेवाणीसाठी देशभरातील सायकल मेअर एकत्रित करून राष्ट्रीय कार्यशाळेच्या माध्यमातून एक गतिमान व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच, पिंपळे सौदागर परिसरात मनपा व स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून सुस्थापित केलेल्या सायकल ट्रॅकवर सायकल चालवून सायकल मेअर यांच्या उत्साही सहभागाने शाश्वत वाहतुकीसाठी दृढ समर्पण दर्शविले. सायकलिंगच्या पलीकडे, कार्यशाळेच्या मालिकेमध्ये शहरी नियोजन, डिझाइन आणि पथ व्यवस्थापन या महत्त्वाच्या पैलूंवर चर्चा करण्यात आली.
हिरवे रस्ते, आनंदी रस्ते..
“हेल्दी स्ट्रीट्स लीड टू हॅप्पी स्ट्रीट्स” या थीम अंतर्गत आयोजित कार्यशाळेने शाश्वत वाहतुकीला चालना देण्यासाठी शहरी रस्त्यांच्या पायाभूत सुविधांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. बीवायसीएस इंडिया फाऊंडेशन द्वारे पिंपरी चिंचवड महापालिकेची सक्रिय भूमिका, भविष्यासाठी अधिक हिरवे, अधिक उत्साही समुदाय तयार करण्यासाठी वचनबद्धता दर्शवित आहे.
“पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरी जीवनाला आकार देण्यासाठी समर्थन दिले आहे. त्यामाध्यमातून रस्त्यांच्या पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रत्यक्ष अनुभव, तज्ञांच्या अंतर्दृष्टीसह, शाश्वत शहरी रस्त्यांसाठी सामूहिक उत्कटता प्रज्वलित केली आहे. महापालिका आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या समर्पणाने आरोग्यदायी, आनंदी उद्यासाठी पर्यावरणपूरक गतिशीलतेला प्राधान्य देणार्या शहरांची कल्पना करत आहे.”
– आशिक जैन, सायकल मेअर, पिंपरी चिंचवड
” पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी नॉन-मोटराइज्ड ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याची कटिबद्ध आहे. भविष्याची संकल्पना, शाश्वत शहरी वाहतुक केवल एक पर्याय नसून एक महत्वाची गरज अहे. “सायकल मेअर नेटवर्कसारख्या गटांच्या पाठिंब्याने, आमच्या प्रयत्नांना गती मिळत आहे.
– शेखर सिंह, महापालिका आयुक्त.