पिंपरी (Pclive7.com):- चऱ्होली येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री तरसाचा वावर आढळून आला. कुत्र्याची शिकार करून तरस कुत्र्याला तोंडात पकडून शेतात पळून गेल्याचा व्हिडिओ हाती आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वी शेजारीच असलेल्या चिखली परिसरात बिबट्याचा शिरकाव झाला होता. आता लोकवस्ती असलेल्या चऱ्होली परिसरात तरस दिसला आहे. चऱ्होलीतील, डुडुळगाव, चोविसावाडी येथील परिसरात नागरी वस्तीसह बागायती शेतीचे क्षेत्र आहे. येथे शेती करणारा वर्ग जास्त आहे. नागरिक शेतीच्या कामासाठी जात असतात. त्यामुळे वनविभागाने या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.