मुंबई (Pclive7.com):- महाराष्ट्रातही २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्य सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सध्या संपूर्ण देशात राम मंदिराच्या उद्घाटनाचा उत्साह पाहायला मिळतोय. त्याचसाठी राज्य सरकारकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
अयोध्येत २२ जानेवारी २०२४ अयोध्येत श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीरामललांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी राज्यातील अनेक मंत्री आमदारांनी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून, महाराष्ट्र सरकारद्वारे २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
























Join Our Whatsapp Group