पिंपरी (Pclive7.com):- अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी २० लाख ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला. सांगवी स्मशानभूमीजवळ रविवारी (दि.१७) दुपारी पावणे बाराच्या सुमारास पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.
ओंकार उर्फ सोन्या महादेव लिंगे (वय २६), अनिकेत अनिल गोडांबे (२५), रोहन उत्तम कांबळे (२१), रुपेश गौतम जाधव (२१), रोहन उर्फ पप्या महादेव लिंगे (२४, सर्व रा. दापोडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह विशाल उर्फ महाद्या गोरख कदम, सेनानी, हर्ष, मयूर प्रवीण बाराथे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस अंमलदार विजय दौंडकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.
सांगवी स्मशान भूमीजवळ काहीजण गांजा घेऊन आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करून पाच जणांना ताब्यात घेतले.
























Join Our Whatsapp Group