पिंपरी (Pclive7.com):- विक्रीसाठी अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख ७३ हजार रुपये किमतीचे २५.४० ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) व दोन मोबाइल जप्त केले. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तळेगाव दाभाडे येथे तळेगाव उर्से रस्त्यावर शनिवारी (दि.२७) दुपारी सव्वादोनच्या सुमारास ही कारवाई केली.
जनार्दन दगडू पवार (वय ३४, रा. माळीनगर, वडगाव मावळ, ता. मावळ), शशिकांत बाळासाहेब मराठे (२५, रा. वराळे, ता. मावळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस हवालदार दत्तात्रय बनसुडे यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी त्यांच्याकडे विक्रीसाठी अमली पदार्थ बाळगल्याची माहिती मिळाली.
























Join Our Whatsapp Group