पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडमधील सायन्स पार्क येथील ‘तारांगण’ दुरुस्तीच्या कामासाठी दहा दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे ऐन सुट्टीच्या कालावधीत तारांगण पाहण्यास येणाऱ्यांचा हिरमोड होत आहे.
तारांगणचे गेल्यावर्षी १५ मे रोजी उद्घाटन झाले. तेव्हापासून दररोज गर्दी होत आहे. येथे खगोलशास्त्राच्या माहितीवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये दररोज सहा शो दाखविले जातात. ऑप्टोमेकॅनिकल व डिजिटल पद्धतीच्या माध्यमातून हायब्रिड प्रोजेक्शन पद्धतीचे अत्याधुनिक तारांगण विकसित केलेले आहे. खगोल विज्ञानातील १७ वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम जपान येथील गोटो कंपनीच्या साहाय्याने तयार केले आहेत. खगोलशास्त्राच्या १२ क्लिप्स उपलब्ध आहेत.
तारांगणचे वार्षिक देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू आहे. तारांगणच्या डोममधील दोन काचांमध्ये डांबरासारखे सोल्युशन लावलेले असते. ते उन्हामुळे पातळ होते. डोमच्या छतावर पक्षी बसल्यानंतर चोच मारून ते सोल्युशन काढतात. त्यामुळे डोमचे छत पावसामुळे गळू लागते. तारांगणमध्ये महागडे प्रोजेक्टर असल्याने त्याची काळजी घेण्यासाठी तारांगण बंद ठेवण्यात आले आहे.
– नंदकुमार कासार, शिक्षण अधिकारी, सायन्स पार्क.