पिंपळे निलख (Pclive7.com):- तंबाखू मागितली असता, न दिल्याच्या रागातून तिघांनी तरुणावर कोयत्याने वार केले आहेत. ही घटना पिंपळे निलख येथे बुधवारी (दि.२२) घडली आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात कृष्णाकुमार उपेंद्र पासवान (वय २१ रा. पिंपळे निळख) फिर्याद दिली आहे. यावरून शुभम मानमोडे (रा.पिंपळे निलख), संकेत थोरात (रा.वाकड) व त्याचा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड महिन्यापूर्वी तंबाखू दिली नाही याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली. यावेळी संकेत याने कोयत्याने फिर्यादीच्या हातावर डोक्यावर वार केले. तसेच फिर्यादीनुसार दुचाकीचे नुकसान केले. यावरून सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.