चिंचवड (Pclive7.com):- श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला चंदन उटीचे लेपन, शेकडो फुलांची आकर्षक आरास करण्यासोबतच विद्युतरोषणाईने शुभम लॅान्स समोरील, जिजाऊ गार्डन जवळ, मोरया गोसावी मंदिर रोड, चिंचवडगाव येथे असलेले श्री स्वामी समर्थ मंदिर सजले होते. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गजाननभाऊ दशरथ चिंचवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सजावट करण्यात आली. याप्रसंगी आमदार उमाताई खापरे यांच्या शुभहस्ते श्रींची आरती संपन्न झाली.
श्री स्वामी समर्थ मंदिर चिंचवड गाव येथे चंदन उटी सोहळ्या निमित्त नादवेध प्रस्तुत भक्ती संध्या हा कार्यक्रम पार पडला गायक -दशरथ शिंदे यांनी देवाचिये द्वारी, आवडे हे रुप गोजिरे सगुण, केशवा माधवा, अभंग गायन केले. तसेच प्रसिद्ध गायिका -शर्मिला शिंदे यांनी स्वामीभक्तीगीते गायली. त्यामध्ये स्वामी समर्थ माझी आई, विश्वाचा विश्राम रे, स्वामी समर्था सतगुरू नाथा, तारक मंत्र गाऊन रसिकांची दाद मिळवली बाल कलाकार -स्वरा शिंदे हिने देह देवाचे मंदिर, माझी आई अक्कलकोटी, गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले संपूर्ण कार्यक्रमाला तबला साथ -निलेश शिंदे यांनी केली.
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, राजाभाऊ गोलांडे, ललिता चिंचवडे, नूतन चव्हाण, संतोष निंबाळकर, शुभम चिंचवडे, कैलास गावडे, निलेश मरळ, ज्योतीताई निंबाळकर, ज्योतीताई भालके, संदिप कोकाटे, वतन वाल्हेकर, शिरिष जतकर, ऋषिकेश पवार, गणेश पाडाळे, सचिन लाड, पाटीलबुवा चिंचवडे, भाग्यदेव घुले, विनायक जगताप, दिलीप चिंचवडे, शिवाजी चिंचवडे, पांडुरंग पाडाळे, गणेश मिरजकर, हरिष मोरे, संजय चिंचवडे, सागर गावडे, आवेश चिंचवडे, शिरिष सोले, डॉ. व्ही.जी.सावंत, हर्षद रुपारेल, विजय चिंचवडे, पांडुरंग पडवळ, अजित चिंचवडे, गणेश चिंचवडे, संतोष चिंचवडे, संदिप भालके, नारायण गावडे, विजय घारे, अजय गायकवाड, संदिप दांडेकर, शरद गोखले, कार्तिक चिंचवडे, समीर चिंचवडे, प्रतिक चिंचवडे, रोहित चिंचवडे, महेश चिंचवडे, अनुज शहा, राहूल आहेर, लक्ष्मण नायकवडी व मोठ्या संख्येने स्वामी भक्त उपस्थित होते.