नवी सांगवी (Pclive7.com):- पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या राजमाता जिजाऊ उद्यानात योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय योग संस्थान, राजमाता जिजाऊ उद्यान ग्रुप, नवचैतन्य हास्य परिवार सेवा संघ, तानाजी जवळकर मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
योग प्रशिक्षक मीनाक्षी खैरनार यांनी उपस्थितांना योगाबद्दल माहिती देत योग प्रशिक्षणाचे धडे दिले. दोनशेहून अधिक जण यामध्ये सहभागी झाले होते. याप्रसंगी तानाजी जवळकर, संजय जगताप, पोपट जगताप, बाळासाहेब देवकर, मधुकर रणपिसे, अतुल काशीद, पुंडलिक कोळी, सुभाष खुडे, प्रमोद माने आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group