पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मल्हार मकरंद जोशी अस आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. अद्याप आत्महत्येच कारण समजू शकलं नाही. शेवटचा कॉल हा त्याच्या आईला मल्हारने केला होता. त्यांनतर त्याने अस टोकाचं पाऊल उचलले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर मध्ये रोझ लँड सोसायटीच्या एक्स विंगच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन अवघ्या १४ वर्षाच्या मल्हार मकरंद जोशी या अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी अवघ्या चौदाव्या वर्षी मल्हारने आयुष्य संपवण्याचा निर्णय का घेतला? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. इयत्ता नववी मध्ये शिकत असलेला मल्हार आणि त्याचा भाऊ हे दोघेच घरी होते. तर आई- वडील हे बीड जिल्ह्यातील परळी येथे बाहेरगावी गेले होते. आज दुपारी बाराच्या सुमारास मल्हार आईला फोन लावण्यासाठी आईच्या मैत्रिणीकडे गेला होता. आईशी फोनवरून बोलणं देखील झालं. त्याच वेळेत मल्हारने उडी घेऊन आत्महत्या केली आहे. नेमकं मल्हारच त्याच्या आईशी काय बोलणं झालं? याचा तपास सांगवी पोलीस घेत आहेत.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240703-WA0026-300x200.jpg)