पिंपरी (Pclive7.com):- रती क्रिएशन एज्युकेशन, संगणक प्रशिक्षण संस्था संत तुकाराम नगर पिंपरी यांच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त चिंचवड येथील गुरुकुलम आश्रम शाळेमध्ये आज (दि.०१) शालेय उपयोगी वस्तू भेट स्वरूपात देण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा सौ.मेघा सचिन लाड त्यांचे सहकारी शिक्षक निशा मॅडम, अश्विनी मॅडम, गायत्री मॅडम आणि प्रवक्ते संतोष पाचपुते सर, सौ.लाड काकू तसेच मार्गदर्शक गजानन भाऊ चिंचवडे उपस्थित होते.

यावेळी पहिली ते दहावी मधील निवासी मुलांना लागणारे शालेय साहित्य, भेटवस्तू यांचे वाटप रती कॉम्पुटर तर्फ करण्यात आले. ह्या उपक्रमात डॉ. मनोज बागडे आणि व्यावसायिक मित्र हितेश प्रजापती यांचा देखील सहभाग मिळाला. गुरुकुलम संस्थेचे संस्थापक पद्मश्री गिरिष प्रभुणे सर यांच्या प्रामाणिक कार्याचे कौतुक करत सचिन लाड यांनी मुलांना कॉम्पुटर शिक्षण मोफत देण्याचे आश्वासन दिले.



















Join Our Whatsapp Group