चिंचवड (Pclive7.com):- शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये नागपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात महिलांनी साजरा केला. प्रतिष्ठानच्या वतीने नागाची सहा फुटी प्रतिकृती तयार करण्यात आली होती. सकाळी या प्रतिमेचे पुजन महिला मंडळाच्या कार्याध्यक्ष सारिका रिकामे व उपाधक्षा अंजली देव यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2024/08/IMG-20240806-WA0031-300x150.jpg)
वारुळाचे पूजन क्षमा काळे व व मनीषा देऊ काकू यांच्या हस्ते झाले. नागपंचमी निमित्त झोके बांधण्यात आले असून झोक्याचे उद्घाटन तारामती बहिरवाडे व शोभा नलगे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर महिलांनी झिम्मा फुगडी फेर, इत्यादी पारंपारिक खेळ खेळून आनंद साजरा केला. सदर कार्यक्रमाचे संयोजन श्री स्वामी समर्थ महिला मंडळ यांनी केले असून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नीलिमा भंगाळे, प्रीती झोपे, श्रद्धा बहिरवाडे, मोहिनी शिराळकर, अनिता थोरात, सुनिता वायाळ, सारिका सूर्यवंशी, सविता राणे, शरयू कांगडे, अर्चना काकडे, गीतांजली पाटील, मनीषा भडांगे आदींनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमासाठी परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सर्वांनी नागप्रतिमा वारूळ यांची पूजा करून आणि झोक्याचा आनंद घेतला.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240624-WA00001-300x300.jpg)