तळेगाव (Pclive7.com):- तळेगाव एमआयडीसी परिसरात बसविण्यात आलेल्या आरओ वॉटर फिल्टरची तोडफोड करून त्यातील अंदाजे १० हजार रुपयांची नाणी चोरी केल्याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एकाला अटक केली आहे.

ही घटना ७ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते ९ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या कालावधीत शिंदे हॉटेलसमोर, तळेगाव-चाकण रोड, माळवाडी (ता. मावळ) येथे घडली.
याप्रकरणी ऋषिकेश मसू साखरे (वय ३१, रा. माळवाडी डेपो रोड, मावळ) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिव्येश सुभाष नगरकर (वय २५, रा. मनोहरनगर, तळेगाव दाभाडे) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण रोडवरील आरओ वॉटर फिल्टरमधील कॉईन बॉक्स फोडून त्यातील सुमारे १० हजार रुपयांची नाणी चोरून नेण्यात आली. तसेच आरओ यंत्रणेचीही तोडफोड करण्यात आली. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.




















Join Our Whatsapp Group