आळंदी (Pclive7.com):- कमला एकादशीच्या निमित्ताने आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आकर्षक व मनमोहक पुष्पसजावट करण्यात आली. मंदिर परिसर विविधरंगी फुलांच्या माळांनी सजविण्यात आला असून समाधीस्थळाचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.

पिवळ्या, केशरी रंगेबीरंगी फुलांच्या देखण्या सजावटीमुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने नटला आहे. समाधीसमोर विशेष फुलांची आरास करण्यात आली असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

कमला एकादशीचे औचित्य साधून हजारो भाविकांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या असून दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यात आली आहे. या भव्य पुष्पसजावटीमुळे मंदिराचे आध्यात्मिक आणि सौंदर्यपूर्ण रूप अधिकच खुलले असून भाविकांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.



















Join Our Whatsapp Group