पिंपरी (Pclive7.com):- निगडी सेक्टर २२ येथील तब्बल १९ वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. हा प्रकार रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास घडला आहे. तीन ते चार जणांच्या आलेल्या टोळक्याने कोयता दगड आदी हत्यारांनी येथील वाहनांची तोडफोड केली.

मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथील सेक्टर २२ मध्ये रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास आलेल्या टोळक्याने दहशत माजविण्याकरिता वाहनांची तोडफोड केली. या घटनेत गोरगरिबांच्या १९ वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. यात प्रवासी रिक्षा, वाहतूक करणारे टेम्पो, टेम्पो ट्रॅव्हलर्स, स्कूल बस आदींचा प्रामुख्याने समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील आरोपींचा शोध सुरू आहे.






















Join Our Whatsapp Group