वाकड (Pclive7.com):- वाकड परिसरात वेणुनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ज्येष्ठांसाठी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आज या कॅरम स्पर्धेचे माजी नगरसेवक ॲड.विनायक रमेश गायकवाड यांनी उद्घाटन करीत सामन्यांची सुरुवात केली.

वाकड परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ह्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये एकेरी व दुहेरी स्पर्धा असणार आहेत. वेणुनगर ज्येष्ठ नागरिक सघ यांच्यावतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेस ज्येष्ठ सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ५० स्पर्धकांनी सहभाग घेतलेला आहे. १४ ऑगस्ट पर्यंत ह्या स्पर्धा असून १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी अंतिम सामना असेल.

यावेळी वेणुनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.मधुकर राहटे, उपाध्यक्ष श्री.राजेंद्र बडगुजर, उपाध्यक्ष श्री.बी.आर.पाटील व सर्व सभासद आणि नागरिक उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group