आकुर्डी (Pclive7.com):- आकुर्डी येथील ऐश्वर्यम कम्फर्ट सोसायटीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राज्य शासनाचा शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत विविध विभागांचे पुरस्कार प्राप्त जलतरणपटू कु. वैष्णवी विनोद उमा जगताप हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी सोसायटीमधील दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला. तसेच स्वरसंहिता वंद्य वंदे मातरम् अजरामर देशभक्ती गीताची सुरेल राष्ट्र वंदना कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते.

यावेळी सोसायटी मधील जेष्ठ नागरिक, महिला भगिनीं, नागरिक यांची लक्षणीय उपस्थिती होती. प्रास्ताविक व सुत्रसंचलन अमीन शेख यांनी केले. अध्यक्ष अमोल गोरखे, सचिव निलेश जाधव, खजिनदार मिलिंद पांडे, सदस्य पंकज ताले, संजीव ट्रामा, अमित बाबर, कल्याण कळपे, निलेश डोईजोडे, सेबी पॉल, अंकुर पाडेकर, श्रध्दा जाधव यांनी संयोजन केले.

सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर बहीरवडे, नारायण निंदळेकर, गोपाळ सावंत यांनी परीश्रम घेतले. आभार प्रदर्शन निलेश जाधव यांनी मानले.






















Join Our Whatsapp Group