पिंपरी (Pclive7.com):- १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त युवासेना शहर संघटक निलेश हाके यांच्या संकल्पनेतून सन्मान युवा प्रतिष्ठाणची स्थापना करण्यात आली. प्रतिष्ठाणच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचा मानस असून आज त्याची सुरुवात व उद्घाटन समारंभ मोठ्या दिमाखदार सोहळ्यात पार पडला.

प्रभागातील १२ वी १२ वीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दापोडी फुगेवाडीतील गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या व शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच दापोडीतील भजनी मंडळास टाळ व मृदुंग भेट देण्यात आले.
प्रतिष्ठानच्या उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण होईल व भविष्यात त्यांचा आदर्श घेत नवीन विद्यार्थ्यी घवघवीत यश संपादन करतील वारकरी संप्रदायातील वारसा जोपासण्याचे या माध्यमातून प्रतिष्ठान करत असल्याचे मत यावेळेस माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी व्यक्त केले. तसेच सन्मान युवा प्रतिष्ठाणाचे व नवनिर्वाचित अध्यक्ष अविनाश जाधव यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगरसेवक राजाभाऊ बनसोडे, माजी संजय नाना काटे, संजयभाऊ कणसे, माजी नगरसेविका माई काटे, माजी किरण मोटे, शशिभाऊ देशपांडे, यशवंत मामा वाखारे, सौ.मीनाक्षी गायकवाड, सन्मान युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.