भोसरी (Pclive7.com):- कुख्यात गुन्हेगार सूरज रणदिवे टोळीवर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी संघटित गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम (मोका) अन्वये कारवाई केली. सूरज आणि त्याच्या सात साथीदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

टोळी प्रमुख सूरज प्रकाश रणदिवे (वय ३०, रा. घरकुल, चिखली), टोळीतील सदस्य विवेक विनोद नाईक उर्फ सोन्या (वय २० रा. खंडेवस्ती, भोसरी), सौरभ कानिफनाथ भोपले (वय २०, रा. खंडेवस्ती, भोसरी), अथर्व उदय पकाले (वय २०, रा. एमआयडीसी भोसरी), प्रतीक ज्ञानेश्वर सपकाळ (वय २८, रा. वाकड), चेप्या उर्फ केतन गौतम सोनवणे (वय २६, रा. मिलिंदनगर, पिंपरी), लकी उर्फ लाखा उर्फ सुनील रामभाऊ पवार (वय २४, रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) आणि एक अल्पवयीन मुलगा अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.
या टोळीची घरकुल चिखली, खंडेवस्ती, भोसरी, नेहरुनगर, पिंपरी या भागात दहशत आहे. टोळीने नागरिकांना अनेक वेळा त्रास दिला होता. त्यांच्या दहशतीमुळे कोणीही तक्रार देत नव्हते. या टोळीने यापूर्वी कोणास त्रास दिला असल्यास त्यांनी एमआयडीसी भोसरी पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. साहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group