पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) आणि भारत सरकारचे बोर्ड ऑफ अप्रेंटीसशीप ट्रेनिंग व महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स यांच्या संयुक्त विद्यमाने पीसीसीओई, प्राधिकरण, निगडी, पुणे येथे अप्रेंटीसशीप भरती मेळाव्याचे आयोजन शनिवारी (२४ ऑगस्ट २०२४) सकाळी नऊ वाजता करण्यात आले आहे, अशी माहिती पीसीईटीच्या सेंट्रल प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
या भरती मेळाव्यात मागील पाच वर्षात उत्तीर्ण झालेले अभियांत्रिकीचे डिप्लोमाधारक, बीई/बीटेक, आयटीआय, बीए, बीकॉम, बीएससी, बीबीए, बीसीए, बी. फार्म व इतर कोर्सेसचे पदवीधारक विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या भरती मेळाव्यात सहभागी होण्याकरिता विद्यार्थ्यांना अथवा कंपन्यांना कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व कंपन्यांनी या अप्रेंटीसशीप भरती मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन डॉ. रवंदळे यांनी केले.
कंपन्यांनी या अप्रेंटीसशीप भरती मेळाव्यात सहभागी होण्याकरिता खालील लिंक वर नोंदणी करावी :
तसेच विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याकरिता खालील लिंक वर नोंदणी करावी :
या भरती मेळाव्यात केएसबी लिमिटेड, कायनेटिक ह्युंदाई, रॉस प्रोसेस, बेलराइज, मुबिया ऑटोमोटिव्ह, सुमॅक्स, बजाज फायनान्स, बीव्हीजी इंडीया, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट यासारख्या सुमारे ५० नामांकित कंपन्या सहभागी होणार असून सुमारे दोन हजार अप्रेंटिसशिपच्या संधी उपलब्ध होतील. अप्रेंटीसशीप दरम्यान विद्यार्थ्यांना भारत सरकार तर्फे व कंपनीतर्फे दरमहा आकर्षक मानधन दिले जाते. तसेच अप्रेंटीसशीपचा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुतांश कंपन्या पूर्णवेळ कर्मचारी म्हणून पुढील नियुक्ती देतात, अशी माहिती बोर्ड ऑफ अप्रेंटीसशीप ट्रेनिंगचे संचालक पी. एन. जुमले व उपसंचालक एन. एन. वडोदे यांनी दिली.
या भरती मेळाव्या करिता पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या.
या भरती मेळाव्याच्या आयोजना करिता पीसीईटीच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे, प्रा. संदीप पिल्लेवार, प्रा. दिपक पवार, प्रा. ऋषिकेश पांडे, प्रा. विजय टोपे, प्रा. अजित शिंदे, प्रा. हीना शर्मा, प्रा. ऐश्वर्या पाटील, मंगेश काळभोर सर्व विभागातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे शिक्षक प्रतिनिधी आणि विद्यार्थी, प्रतिनिधी परिश्रम घेत आहेत.