पिंपरी (Pclive7.com):- बनावट शेअर ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यातून हिंजवडी येथील एका व्यक्तीची ७४ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने छत्रपती संभाजीनगर येथून टोळीला बेड्या ठोकल्या.

येथील साजीद शहा कासम शहा (३०), अभिजित रामराव श्रीरामे (३२, दोघेही रा. छत्रपती संभाजीनगर), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या इतर साथीदांराचा शोध सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथील एका व्यक्तीने फसवणूकप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. जुलै २०२४ मध्ये फिर्यादी फेसबुक पाहत असताना ट्रेडिंगबाबतची जाहिरात आली. जाहिरीतीमधील लिंक क्लिक केली असता, त्यांना एका व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले. त्यानंतर संशयितांनी तक्रारदाराला अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्याच खात्यामध्ये चार कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, पोलिस अंमलदार दीपक भोसले, अतुल लोखंडे, प्रिया वसावे, अशोक जावरे, श्रीकांत कबुले, अभिजित उकीरडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.






















Join Our Whatsapp Group