पुणे (Pclive7.com):- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परीहार चौक, औंध, पुणे येथे एकूण ३३ व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये १,६९६ उमेदवारांसाठी प्रवेश प्रक्रियेतील शेवटचा टप्पा सुरु आहे. संचालनालयाने प्रवेशाची मुदत वाढवून दिलेली असुन १७ सप्टेंबर, २०२४ पर्यंत विद्यार्थ्यांनी संस्थेमध्ये प्रत्यक्ष येवून अभ्यासक्रमांची माहिती घ्यावी. १९ ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत रिक्त जागांवर प्रवेश होणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावेत.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी इयत्ता दहावी पास अथवा नापास शैक्षणिक अर्हता आहे. अभ्यासक्रम एक व दोन वर्ष मुदतीचे आहेत. त्यासाठी प्रतिवर्षी साधारणपणे दोन हजार रुपये शुल्क आहे. प्रत्येक व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये तीस टक्के जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. पुणे परीसरातील औद्योगिक आस्थापनांमध्ये महिलांना नोकरीच्या भरपुर संधी उपलब्ध असल्याने महिलांना या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी विशेष आवाहन करण्यात येत आहे.
प्रवेश घेण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना मार्गदर्शन हवे असल्यास त्यांनी आय.टी.आय, औंध, पुणे येथे प्रत्यक्ष येवून किंवा संस्थेच्या हेल्पलाईन क्रमांक ८८५७९८४८२२ वर संपर्क साधुन माहिती घ्यावी. रिक्त जागांचा तपशिलासाठी संस्थेस भेट द्यावी. प्रवेशासाठी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन उपसंचालक आर. बी. भावसार यांनी केले आहे.
Tags: औंध आयटीआय