पुणे (Pclive7.com):- अखिल पुणे शहर रामनवमी उत्सव समितीच्या वतीने रामनवमीनिमित्त रविवारी (दि. २५ मार्च) शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याबरोबरच विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
हैद्राबाद येथून खास बनविलेली श्रीरामाची भव्य मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मूर्ती, पारंपरिक पद्धतीने शोभायात्रा, ढोलताशा पथक, आकर्षक विद्युत रोषणाई ही या मिरवणुकीची वैशिष्ट्य असून ही मिरवणूक राम मंदिर, जिलब्या मारुती मंडळ चौक, तुळशीबाग येथून रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता मिरवणुकीला सुरवात होणार आहे.
या भव्य दिव्य शोभयात्रेचे थेट प्रक्षेपण ‘बाप्पा माझा’ या सोशल मीडियावर पाहायला मिळेल. शहरातील जास्तीत जास्त हिंदू बांधव व श्रीराम भक्तांनी या मिरवणुकीला उपस्थित राहून या मिरवणुकीची शोभा वाढविण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.