पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड विद्यार्थी वाहतूक संघटनेची वार्षिक महासभा व मार्गदर्शन शिबिर चिंचवड येथे नुकतेच संपन्न झाले. चिंचवड येथील प्रभू रामचंद्र सभागृह येथे संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभेच्या सुरुवातीला उद्योगरत्न रतन टाटा व संघटनेतील मृत्यू झालेल्या सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर वाहन चालक, मालक यांना काटेकोरपणे सर्व्हिस देण्याची शपथ ग्रहण करण्यात आली.
पिंपरी चिंचवड ब्लड डोनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजू शिवतारे, तानाजी धुमाळ, योगेश कांबळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रादेशिक परिवाहन अधिकारी संदेश चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजी धुमाळ व योगेश कांबळे यांनी सभासद व चालक-मालक यांना वाहतूक सुरक्षा व शालेय वाहन देखभाल चालकांना मार्गदर्शन केले. तसेच स्कूलबस धोरण २०११ अनुषंगाने शालेय विद्यार्थी वाहतूक नियम काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी संघटनेचे एकूण सभासद ९४८ पैकी शहरातील ४३ खाजगी व सरकारी शाळेतील २६७ सदस्य उपस्थित होते. या सर्वांच्या शंकेचे निरासन, तक्रारी, पुढील दिशा ठरवण्याची ग्वाही संघटनेचे अध्यक्ष सुनील लांडगे यांनी दिली. आणि अनपेक्षित घटना घडू नये याची काळजी घ्यावी. एखाद्या ड्रायव्हरचे चाल चलन वेगळे दिसले तर त्याला जागीच तंबी देऊन कामावरून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वानुमते शहरात भविष्यात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही. याची काळजी चालक मालक यांनी घ्यावी. येणाऱ्या अडचणीना एकजुटीने सामोरे जाऊ व महापालिका महाराष्ट्र सरकार यांच्याकडून आपल्याला काही सुविधा सुरु करता येतात का? याबाबतही चर्चा करण्यात आली आपला व्यवसाय असंघटित असल्यामुळे भविष्याच्या दृष्टीने पेन्शन किंवा अनुदान कसे मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात यावा. कोरोना काळातील दोन वर्ष वाया गेल्यामुळे तो कालावधी वाढून मिळावा परमिट नूतनीकरण पासिंग व इतर प्रश्न सभेपुढे आले याचे निरसन आरटीओ तर्फे धुमाळ साहेब यांनी केले. सभेसाठी संघटनेचे पदाधिकारी महेश नवले, राजू कंकरे, प्रशांत गोसावी, शंकर लोंढे, सुनील गुंजावटे, विजय क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले तर बाबा भालदार यांनी आभार मानले.





















Join Our Whatsapp Group