पिंपरी चिंचवड शहरातील काळभोरनगर, मोहननगर भागाची विजेच्या लपंडवापासून कायमची सुटका होणार
पिंपरी (Pclive7.com):- अंधारातून प्रकाशाकडे.. कधी काळी याच भागात अंधारात दिव्याखाली मी अभ्यास केला. काकडी विकली आणि आता आमदार झाल्यांनतर माझा पहिला विकास निधी मला याच भागाला देता आला जिथं मी घडलो, त्या भागातील विकासासाठी मला काम करता आले हे मी माझे भाग्य समजतो अशा भावना आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केल्या.
निम्मित होते ते या परिसरातील ३० च्या ऐवजी ६० केव्हीचे २ ट्रान्सफार्मर आमदार अमित गोरखे यांच्या आमदार निधीतून पिंपरी चिंचवडमधील मोहननगर, काळभोरनगर भागाला देण्याच्या भूमिपूजन समारंभ पार पडले.
वर्षानुवर्षे मोहननगर, काळभोरनगर मधील नागरिक नवीन व अत्याधुनिक विजेच्या ट्रांसफार्मरची मागणी करीत होते. या मागणीची दखल घेत आमदार अमित गोरखे यांनी आपल्या आमदार निधीतून ट्रांसफार्मर बसविण्यात येत आहे. यावेळी आमदार अमित गोरखे यांनी आपल्या शालेय व बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच या पुढे आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण परिसराचा विकास करण्याचे आपले स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले.
या भूमीपूजन समारंभाला उपस्थितांमध्ये माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, भाजपा शहर पदाधिकारी कैलास कुटे, गणेश लंगोटे, वैशाली काळभोर, विशाल काळभोर, मारुती भापकर, मनीषा शिंदे, दिलीप दातीर पाटील, दत्ता देवतरसे, विष्णू चावरिया, संजय जगताप, भास्कर पुणेकर, तुळशीराम काळभोर, मिनल यादव, रवि नामदे, राहुल बोरकर, राम दातीर, प्रशांत थरकुड़े, संदीप बामने, प्रसाद हिरणवाळे, भाई भोसले, तुषार नामदे, कमलेश मुथा, नितिन चिलेकर, कमलेश लुंकड यासह पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिक व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group