पिंपरी (Pclive7.com):- ऑनलाईन गेममध्ये लाखो रुपये हरल्यामुळे पैसे कमविण्यासाठी बुलेट चोरी करणाऱ्या आरोपीला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. तसेच बुलेट विक्रीमध्ये सहभागी असलेल्या चार जणांना देखील अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी सुरेश खर्डे हा युट्युबवरील बुलेट चोरीचे व्हिडिओ पाहून चोरी करत असल्याचं पोलीस तपास निष्पन्न झाले आहे. चाकण पोलिसांच्या कारवाईमध्ये ११ बुलेट आणि इतर ७ दुचाकी अशा एकूण २६ लाख रुपये किमतीच्या १८ दुचाकी जप्त केल्या आहेत.
अभय सुरेश खर्डे, रविंद्र निवृत्ती गव्हाणे, शुभम बाळासाहेब काळे, यश नंदकिशोर थुट्टे आणि प्रेम भाईदास देवरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी अभय सुरेश खर्डे हा ऑनलाईन गेम खेळायचा. ऑनलाईन गेममध्ये अभय हा लाखो रुपये हरला होता. लाखो रुपये गेममध्ये हरल्याने तो बुलेट चोरीकडे वळला. युट्युबवरील बुलेट चोरीचे व्हिडिओ पाहून बुलेट चोरी करायला शिकला. अभय बुलेट चोरून मित्रांच्या मदतीने काही हजारात बुलेट विकत असे, मिळालेल्या पैशांमधून पुन्हा ऑनलाईन गेम खेळायचा. अखेर काही बुलेट चोरीची प्रकरण चाकण पोलिसात गेल्याने तपास सुरू असताना अभय पोलिसांच्या जाळ अडकला.
अनेक सीसीटीव्हीत तो बुलेट चोरी करताना कैद झाला होता. चाकण पोलिसांनी तब्बल १५० पेक्षा अधिक सीसीटीव्हीद्वारे आरोपीचा शोध घेतला. फरार आरोपी अभयला संगमनेरमधून सापळा रचून अटक करण्यात आली. त्याच्याकडून ११ बुलेट, ७ इतर दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नाथा घार्गे, तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसंन्न जराड, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे, पोलीस अंमलदार हनुमंत कांबळे, भैरोबा यादव, सुनिल शिंदे, शिवाजी चव्हाण, राजु जाधव रुषीकुमार झनकर, सुदर्शन बर्डे, सुनिल भागवत, महेश कोळी, महादेव विक्कड, रेवनाथ खेडकर, शरद खैरणार, नितीन गुंजाळ, किरण घोडके, माधुरी कचाटे यांनी केलेली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालु आहे.






















Join Our Whatsapp Group