तळेगाव दाभाडे (Pclive7.com):- मावळ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार बापूसाहेब जयवंतराव भेगडे आज (दि.२८) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी सर्वपक्षीय नेतेमंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
पंचमुखी मारुती मंदिरापासून ढोल-ताशांच्या गजरात पदयात्रेला सुरुवात होईल. भेगडे दुपारी १२ वाजता वडगाव मावळ तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करतील. नंतर वडगाव मावळच्या पंचायत समिती चौकात जाहीर सभा होणार आहे. या सभेला ज्येष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. मावळ मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत असून, मोठ्या मताधिक्याने आपला विजय निश्चित आहे, असा दावा भेगडे यांनी केला. अर्ज दाखल करताना सर्वपक्षीय नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
बापूसाहेब भेगडे म्हणाले की, मावळ मतदारसंघाचा कायापालट करण्याच्या ध्येयाने विकासाचे व्हिजन ठेवत जनतेचा विश्वास संपादन केला आहे. जनतेचा विश्वास आणि विकासाची दूरदृष्टी या जोरावर बाजी मारू, विकासाचे ध्येय आणि जनहिताची निष्ठा जोपासत असल्याने माझ्या पाठीशी पुन्हा एकदा संपूर्ण मावळातील मतदार एकवटत आहेत. मावळ विधानसभा मतदारसंघातील यंदाची लढत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही होणार आहे.





















Join Our Whatsapp Group