चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करणारे महायुतीचे नाना काटे यांची समजूत काढण्यासाठी स्वतः अजित पवार त्यांच्या भेटीला आले आहेत. पिंपळे सौदागर येथील नाना काटे यांच्या निवासस्थानी ते आले असून त्यांच्याशी चर्चा करत आहेत.
नाना काटे यांच्या बंडखोरीमुळे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना फटका बसू शकतो. त्यामुळे स्वतः अजित पवार आले तरच नाना काटे ऐकतील असे बोलले जात होते. काही वेळापूर्वी अजित पवार नाना काटे यांच्या घरी दाखल झाले आहेत. चिंचवड मतदार संघातील अजित पवार गटाचे १५ ते २० माजी नगरसेवकांनी नाना काटे यांना पाठिंबा दिला आहे. नाना काटे हे अपक्ष लढण्यावर ठाम राहिले तर त्याचा फटका महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना बसू शकतो. त्यामुळे अजित पवार त्यांची मनधरणी करण्याकरिता आले आहेत. आता नेमकी त्यांच्यात काय चर्चा झाली याबाबत अजून स्पष्ट माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे नाना काटे त्यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवणार की माघार घेणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.