चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदार संघातील भाजपा महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ रावेत आणि किवळे परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये प्रचार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे नेतृत्व आणि मार्गदर्शन सौ. ऐश्वर्या जगताप रेणुसे आणि वीरेन जगताप यांनी केले. या बैठकीत विविध सोसायटीमधील अनेक नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या प्रश्नांवर चर्चा केली.

बैठकीमध्ये परिसरातील रहिवाशांनी आपल्या समस्या आणि गरजांवर भाष्य केले, ज्यामध्ये रस्ते, पाणी पुरवठा, लाईट आणि स्वच्छतेसारख्या मुलभूत सुविधांवर विशेष लक्ष देण्यात आले. ऐश्वर्या जगताप रेणुसे यांनी या सर्व समस्यांना सोडवण्यासाठी शंकर जगताप यांच्या संकल्पनेबद्दल सांगितले व त्यांचे विकासकार्य आणि भविष्यातील योजना उपस्थित नागरिकांसमोर मांडल्या. त्यांनी यावर विश्वास दिला की, त्यांच्या मार्गदर्शनाखाली रावेत आणि किवळे परिसराचा विकास अधिक वेगाने होईल. या बैठकीला महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.