चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आमदार अश्विनी जगताप यांनी किवळे परिसरात भव्य दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यात त्यांनी विविध क्षेत्रांतील मान्यवर, स्थानिक नेते, तसेच नागरिकांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला. यावेळी नागरिकांनी देखील शंकर जगताप यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केला आहे.

भारतीय जनता पक्षाने चिंचवड मतदार संघात शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर करतात आमदार अश्विनी जगताप यांनी पायाला भिंगरी बांधली आहे. मतदारसंघातील प्रत्येक भागात जाऊन नागरिकांची त्यात संवाद साधत आहेत. नुकताच त्यांनी किवळे प्रभागाचा दौरा केला. या दौऱ्यातील सर्वच सभा आणि गाठीभेटींमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. किवळे परिसरातील जनतेने महायुतीच्या कार्यप्रणालीवर विश्वास दाखवला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा आणि महायुती सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे आणि एकजुटीने उभे राहण्याचे आश्वसन सर्व नागरिकांनी दिले.
या प्रचार दौऱ्याला महायुतीचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक बाळासाहेब तरस, कार्यकर्ते आणि सर्व नागरिक उपस्थित होते.

























Join Our Whatsapp Group