पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार मनोज कांबळे व चंद्रकांत लोंढे या दोघांनी अर्ज माघारी घेतले आहेत. शेवटच्या दिवशी अगदी काही तासांपूर्वी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार त्यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत यांचे काम करणार असल्याचे जाहीर केले आहे.
काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी कार्यरत राहण्याच्या दृष्टीने व महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, परिवहन विभागाचे प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम, पिंपरी चिंचवड महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सायली नढे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ नवले, एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष अँड. उमेश खंदारे यांच्या केलेल्या विनंतीस मान देत काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांनी आज पिंपरी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. यावेळी निखिल भोईर, पांडुरंग जगताप, अण्णा कसबे, स्वाती शिंदे, किरण नढे उपस्थित होते.