चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी पिंपळे निलख परिसरात दौर केला. या दौऱ्यात त्यांनी विविध क्षेत्रांतील मान्यवर, स्थानिक नेते, आणि सामान्य नागरिकांशी ‘डोअर टू डोअर’ भेट घेत संवाद साधला.

यावेळी ज्येष्ठ नेते सचिन साठे, माजी पोलीस पाटील भुलेश्वर नांदगुडे, युवा नेते नितीन इंगवले, माजी नगरसेविका आरती चोंधे, अरुणा गायकवाड, माजी नगरसेवक संदीप कस्पटे, स्नेहा कलाटे, काळूरामशेठ नांदगुडे, नंदू बालवडकर, बाळासाहेब जगताप, संतोष साठे, माऊली साठे, अनिल संचेती, सुरेश गायकवाड, आनंद साठे, सोमनाथ इंगवले, अनंत कुंभार, शिरीष साठे, रणजीत कलाटे, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल व्हावळकर, सूर्यवंशी मॅडम यांच्यासह महायुतीतील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार अश्विनी जगताप यांनी यावेळी ‘डोअर टू डोअर’ भेट देत नागरिकांची संवाद साधला. त्या म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड शहराचा भौगोलिक विकास पाहता चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा एक विकसित विधानसभा म्हणून उदयास आला आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वात पिंपळे निलख, विशाल नगर या परिसराचा कायापालट झाला आहे. चिंचवड मतदार संघातील विकासाला चालना देत असताना इतर सर्व प्रभागांसोबत प्रभाग क्रमांक २६ मध्ये देखील खूप मोठ्ठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहेत. येणाऱ्या काळामध्ये या विकासाला गती देण्याचे स्वप्न उराशी बाळगून महायुतीचे उमेदवार शंकर जगताप हे या निवडणुकीला आपल्या समोर जात आहेत. आपण चिंचवडच्या विकासासाठी आणि आपल्या शहराला जगाच्या पाठीवर विकसित विधानसभा ओळख मिळावी यासाठी शंकर जगताप यांना क्रमांक २ समोरील कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करा असे आवाहन अश्विनी जगताप यांनी केले.
अश्विनी जगताप यांच्या या दौऱ्यास पिंपळे निलख तसेच विशाल नगर परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप व त्यानंतर अश्विनी जगताप यांच्यामुळेच आमच्या भागाचा सर्वांगीण विकास झाला आहे. यापुढेही येथील विकासाला आणखी गती मिळावी याकरिता आम्ही शंकर जगताप यांच्याच पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे आश्वासन नागरिकांनी यावेळी दिले.


















Join Our Whatsapp Group