चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मी देखील तयारी केली होती. मात्र तिकीट न मिळाल्याने मी या निवडणुकीतून माघार घेतली होती. परंतु माघार घेतली तरी चिंचवड विधानसभेच्या विकासाचा मुद्दा हा माझ्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा होता. आणि यासाठी मला सक्षम पर्याय म्हणून महायुतीचे उमेदवार शंकर जगताप हेच योग्य वाटले. त्यामुळे माझ्या सर्व सहकारी मित्रांशी यासंदर्भात चर्चा करून आणि रावेतमधील जनतेचा कौल घेऊन मी शंकर जगताप यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी या निवडणुकीत जगताप यांना किमान एक लाखाच्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी ‘कमळ’ या चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन, मी रावेत आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील जनतेला करतो.
– मोरेश्वर भोंडवे (माजी नगरसेवक)
आमचे सहकारी मित्र मोरेश्वर भोंडवे यांनी दिलेल्या जाहीर पाठींब्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. भोंडवे यांच्याकडेही विकासाची दूरदृष्टी आहे. रावेत गावच्या विकासामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी दिलेल्या जाहीर पाठींब्यामुळे निश्चितच आमची ताकद द्विगुणीत झाली असून आमच्या विक्रमी मताधिक्याने विजयी होण्याचा विश्वास दुणावला आहे. आगामी काळात आम्ही खांद्याला खांदा लावून चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी काम करणार असून त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य कायम आमच्यासोबत असेल. तसेच रावेतच्या जनतेनेही जो विश्वास माझ्यावर व्यक्त केला आहे त्या विश्वासाला नक्कीच पात्र होण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन.
– शंकर जगताप (महायुतीचे उमेदवार)






















Join Our Whatsapp Group