पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा आमदार अण्णा बनसोडे विजयी झाले. पिंपरी विधानसभेत राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार गट) अशी दुरंगी निवडणूक झाली. यामध्ये शरद पवार गटाच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत धर यांना सुमारे ३६,६६४ मतांनी पराभूत करत अण्णा बनसोडे यांनी विजयश्री खेचून आणला आहे.
पिंपरी मतदारसंघात पहिला फेरीपासूनच अण्णा बनसोडे यांनी आघाडी घेतली होती. पोस्टल मतदानात देखील बनसोडे पुढेच होते. शेवटच्या २० व्या फेरी अखेरीस ३६ हजार ६६४ मतांची आघाडी घेत बनसोडे यांनी या निवडणुकीत बाजी मारली.
उमेदवारांना मिळालेली अंतिम मतं
अण्णा बनसोडे – १,०९,२३९ (३६,६६४ आघाडी)
सुलक्षणा शिलवंत – ७२,५७५