पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत महिला व बालकल्याण योजना, दिव्यांग व्यक्तिंच्या विकासाच्या योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना आणि इतर कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. त्यानुसार सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता खालीलप्रमाणे नमुद केलेल्या घटक योजनांच्या अटी व शर्तीनुसार लाभ घेणेकामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील संबंधित घटकातील अर्जदारांनी ऑनलाईन पध्दतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवरील समाज विकास विभाग योजना या सदरामधून दिनांक ०१/१२/२०२४ ते दिनांक ३१/१२/२०२४ पर्यंत अर्ज भरणेत मुदतवाढ देण्यात येत आहे. सर्व घटक योजनांच्या अटी व शर्ती वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
घटक योजना व लाभाचे स्वरुप खालीलप्रमाणे :
मर्यादित कालावधीकरीता असणा-या योजना
महिला व बालकल्याण योजना | ||
अ.क्र. | योजनेचे नाव | लाभाचे स्वरुप |
१ | इ.८ वी ते इ.१० वी मधील विद्यार्थीनींना सायकल घेणेसाठी अर्थसहाय्य. | र.रु. ७,०००/- |
२ | सावित्रीबाई फुले पुरस्कार (सामाजिक संस्था) | र.रु. २५,०००/-, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह |
३ | लोकनायक गोपीनाथ मुंडे – १२ वी नंतरचे (प्रथम वर्ष) वैद्यकीयMBBS, BAMS, BHMS, BDS, BUMS, B.Arch, BPTH, B.Pharm, BVSC आणि अभियांत्रिकी ANM, GNM आणि Bsc Nursing पदवी यांसारखे उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य. | र.रु.२५,०००/- |
४ | मा. रामभाऊ म्हाळगी – मुलींना तांत्रिक प्रशिक्षण किंवा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी अर्थसहाय्य. | आय.टी.आय र.रु. ३,०००/- अभियांत्रिकी पदविका र.रु ७,५००/- |
५ | महाराष्ट्र राज्य मंडळ ( SSC Board) अंतर्गत शाळांमधील इयत्ता १० वी. मधील मुलींना शैक्षणिक साहित्य घेणेकामी अर्थसहाय्य देणे. | र.रु.६,०००/- |
मागासवर्गीय कल्याणकारी योजना |
||
अ.क्र. | योजनेचे नाव | लाभाचे स्वरुप |
१ | माता रमाई आंबेडकर – इयत्ता ५ वी ते १० वी मधील शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वार्षिक शिष्यवृत्ती देणे.
(टिप : या योजनेअंतर्गत मनपाच्या शाळेमध्ये इयत्ता ५ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरीता पिंपरी चिंचवड मनपा शाळेच्या मुख्यध्यापकांनी सर्व विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना आपले अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरणेबाबत सूचना देण्यात याव्यात) |
शिष्यवृत्ती ही वार्षिक स्वरूपाची असून, इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वी मधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना र.रू. ४,०००/- आणि इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी मधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना र.रू. ६,०००/- देण्यात येत आहे. |
२ | महर्षि वाल्मीकी – इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल घेणेकामी एकदाच अर्थसहाय्य देणे. | सायकल खरेदीकामी एकदाच र.रु ७,०००/- पर्यंत अर्थसहाय्य. |
३ | पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर – १२ वी नंतरचे (प्रथम वर्ष) – पदवी अभ्यासक्रम(MBBS, BAMS, BDS, BUMS, BHMS), अभियांत्रिकी पदवी B.Arch, BPTH, B.Pharm, B.Vsc. आभियांत्रिकी ANM, GNM, आणि Bsc Nursing पदवी यांसारखे उच्च शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य देणे. | र.रू. २५,०००/-
(प्रथम वर्षी) एकदाच |
४ | मागासवर्गीय विद्यार्थी / विद्यार्थींनींसाठी विविध संगणक प्रशिक्षण देणे. | प्रत्येक लाभार्थीस उपलब्ध संगणक प्रशिक्षण फी च्या ९०%सवलत.महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत (ITI) मार्फत MKCL अंतर्गत येणारे, MS-CIT, DTP. Tally व KLIC प्रशिक्षण देण्यात येईल. |
दिव्यांग कल्याणकारी योजना |
||
अ.क्र. | योजनेचे नाव | लाभाचे स्वरुप |
१ | पंडित दिनदयाल उपाध्याय – दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती ( इ. १ ली ते वय वर्ष १८ पर्यंत ) | वार्षिक र. रु. २४,०००/- (दरमहा र. रु. २,०००/-) |
२ | पंडित दिनदयाल उपाध्याय – ०५ ते १८ वर्षे वयोगटातील दिव्यांगामुळे शाळेत जाऊ न शकणा-या दिव्यांग मुला / मुलींना दरमहा अर्थसहाय्य. | दरमहा र.रु ३,०००/- अर्थसहाय्य. |
३ | दिव्यांग विद्यार्थ्यांना १२ वी नंतरचे वैद्यकीय (प्रथम वर्ष) (MBBS, BAMS, BHMS, BDS , BUMS) B Arch, BPTH, B.Pharm, BVSC आणि अभियांत्रिकी पदवी परिक्षा यासारखे उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य. | फी ची रक्कम परंतू जास्तीत-जास्त र.रु.१,००,०००/- एकदाच (प्रथम वर्षासाठी) |
४ | दिव्यांगांना MS-CIT, DTP. Tally संगणक प्रशिक्षण देणे. | महापालिका हद्दीत वास्तव्य असलेल्या दिव्यांग व्यक्तींना महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत (ITI) मार्फत MKCL अंतर्गत येणारे, MS-CIT, DTP. Tally व KLIC प्रशिक्षण देण्यात येईल. |
५ | पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील मानव हिताच्या दृष्टीकोनातून काम करणा-या, मतिमंद, अंध, कुष्ठरोगी, मुकबधीर, वृद्धाश्रम, अनाथालय अशा संस्थांना अनुदान देणे. | जास्तीत-जास्त र.रु.२,९९,०००/- |
इतर कल्याणकारी योजना | ||
अ.क्र. | योजनेचे नाव | लाभाचे स्वरुप |
१ | इ.१ली ते पदव्युत्तर पर्यंत शिक्षण घेणा-या मनपा हददीतील अनाथ / निराधार मुलांना शिष्यवृत्ती देणे. | इ.१ ली ते ९ वी १०,०००/-
इ.१० वी ते १२ वी १२,०००/- प्रथमवर्ष ते पदवी पर्यंत १५,०००/- पदव्युत्तर / पदवी २०,०००/- |
२ | इ.१०वी मध्ये ८०% ते ९०% गुण संपादन केलेल्या महाराष्ट्र राज्य् मंडळ (SSC Board),ICSE BOARD / CBSE BOARD अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील विदयार्थी / विदयार्थीनींना बक्षीस रक्कम देणे. | महाराष्ट्र राज्य मंडळ (SSC BOARD) अंर्तगत येणा-या शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींना बक्षीस र.रु. १०,०००/-
CBSE BOARD / ICSE BOARD अंर्तगत येणा-या शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींना बक्षीस र.रु. ५,०००/- |
३ | इ. १०वी मध्ये ९०% पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या महाराष्ट्र राज्य् मंडळ (SSC Board),ICSE BOARD / CBSE BOARD अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील विदयार्थी / विदयार्थीनींना बक्षीस रक्कम देणे. | १.महाराष्ट्र राज्य मंडळ (SSC BOARD)
अंर्तगत येणा-या शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींना बक्षीस र.रु. १५,०००/- २.CBSE BOARD / ICSE BOARD अंर्तगत येणा-या शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींना बक्षीस र.रु. ७,५००/- |
४ | इ. १२ वी मध्ये ८०% ते ९०% गुण संपादन केलेल्या महाराष्ट्र राज्य मंडळ (HSC Board), CBSE BOARD / ICSE BOARD अंतर्गत येणा-या महाविद्यालयातील विदयार्थी / विदयार्थीनींना बक्षीस रक्कम देणे. | १.महाराष्ट्र राज्य मंडळ (HSC BOARD)
अंर्तगत येणा-या शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींना बक्षीस र.रु. १०,०००/- २.CBSE BOARD / ICSE BOARD अंर्तगत येणा-या शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींना बक्षीस र.रु. ५,०००/- |
५ | इ. १२ वी मध्ये ९०% पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या महाराष्ट्र राज्य मंडळ (HSC Board), ICSE BOARD / CBSE BOARD अंतर्गत येणा-या महाविद्यालयातील विदयार्थी / विदयार्थीनींना बक्षीस रक्कम देणे. | १.महाराष्ट्र राज्य मंडळ (HSC BOARD)
अंर्तगत येणा-या शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींना बक्षीस र.रु. १५,०००/- २.CBSE BOARD / ICSE BOARD अंर्तगत येणा-या शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींना बक्षीस र.रु. ७,५००/- |
वरीलप्रमाणे नमूद केलेल्या सर्व घटक योजनांचे अर्ज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची वेबसाईट www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवरुन मुखपृष्ठावरील समाज विकास विभाग योजना या पर्यायावरुन दिलेल्या मुदतीत भरता येतील. प्रत्येक घटक योजनेच्या नमुद केलेल्या अटी व शर्तीनुसार आवश्यक ती कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे. सदरचे ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे अर्ज अर्जदार व्यक्ती, मोबाईल, लॅपटॉप, संगणक किंवा नागरी सुविधा केंद्रांमार्फत विहीत शुल्क भरुन देखील भरता येतील.
टिप :-
१)या जाहीर प्रकटनात नमुद केलेल्या सर्व योजना पिंपरी चिंचवड मनपा हद्दीत राहणा-या
नागरीकांसाठीच आहेत.
२) अर्जदारांना विनंती करण्यात येते की, ऑनलाईन पध्दतीने बिनचूक व परीपुर्ण अर्ज भरण्यात यावेत. ऑफलाईन पध्दतीने भरलेले अर्ज नागरी सुविधा केंद्र अथवा क्षेत्रिय कार्यालय अथवा मुख्य इमारत यापैकी कोठेही स्विकारले जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी. इंग्रजीमध्ये नाव, आधारकार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक बिनचूक भरण्यात यावा तसेच घटक योजनेत नमुद केलेल्या अटी व शर्तीनुसारच सर्व संबंधित कागदपत्रे अपलोड करावीत.
- मर्यादित कालावधीतील योजनांचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरणे व स्विकृती दिनांक ०१/१२/२०२४ ते दिनांक ३१/१२/२०२४ अशी राहील.