मोशी (Pclive7.com):- जुन्या वादातून एका व्यक्तीवर चाकूने वार केले. तसेच त्याच्या पत्नीला मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.३) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास बोऱ्हाडेवस्ती मोशी येथे घडली.
विजय बाबासाहेब साळवे (वय २५), अजय बाबासाहेब साळवे (वय २४), ज्ञानेश्वर वसंत दुनघव (वय २२, तिघे रा. मोशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कैलास सुभाष सुधारे (वय ३५, रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास सुधारे यांच्या घराशेजारी आरोपी राहतात. त्यांच्यामध्ये सांडपाण्याच्या कारणावरून पूर्वी वाद झाले आहेत. त्या कारणावरून आरोपींनी कैलास यांच्या घराचा दरवाजावर जोरजोरात लाथा मारून दरवाजा तोडला. घरात येऊन कैलास यांच्यावर चाकूने वार केले. तसेच त्यांच्या पत्नीला बेदम मारहाण केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.