पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मशानभूमी व विद्युत दाहिनी येथे महापालिकेचे कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. त्या ठिकाणी प्रत्येक स्मशानभूमीत नऊ कामगार कार्यरत आहेत. त्यातील काही कर्मचाऱ्यांनी विविध कारणावरून कोर्टात धाव घेत तक्रार दिलेल्या १२२ कर्मचाऱ्यांना सोडून इतर प्रामाणिकपणे काम करणार्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक स्मशान भूमीतून दोन असे कर्मचारी काढून टाकण्यात येत आहेत. वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी काम करणाऱ्या काहींना १५ ते २० किलोमीटर लांबच्या स्मशानभूमीत पाठवून नाहक त्रास दिला जात आहे. याबाबत कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
या घटनेची दखल घेत युवासेना शहर संघटक निलेश हाके यांनी आयुक्तांना त्या कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा रुजू करण्याची व वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी ठेवत प्रत्येक स्मशानभूमीतील २ कर्मचारी कमी करण्याचा जाचक नियम रद्द करण्याची मागणी केली, अन्यथा पिंपरी-चिंचवड युवासेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा हाके यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला.