पिंपळे सौदागर (Pclive7.com):- प्रभाग क्र.२८ रहाटणी-पिंपळे सौदागर येथील योगा पार्कचे काम अंतिम टप्प्यात आहे असून लवकरच या गार्डनचे लोकार्पण होणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी दिली. पिंपळे सौदागर येथे बनविण्यात येणाऱ्या योगा पार्कच्या विकास कामाची पाहणी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील व अधिकारी यांच्या समवेत केली.
नागरिकांसाठी विविध सोयीसुविधायुक्त असे योगा पार्क पिंपळे सौदागर येथे साकारण्यात येत आहे. यामध्ये १८ मीटर उंचीची बोल्डरिगं वॅाल, २१ मीटर स्पीड वॅाल, २१ मीटर लीड वॅाल, लहान मुलासाठी विविध खेळणी प्रकार, जेष्ठासाठी बैठक व्यवस्था, स्वतंत्र योगा व्यायामासाठी व्यवस्था, वॅाकीग ट्रॅक, प्रशस्त गार्डन व्यवस्था बनविण्यात आली आहे. या योगा पार्क मधे बनविण्यात आलेली क्लायबिंग वॉल ही अशिया मधील सर्वात मोठी वॉल आहे. या वॉल मध्ये सराव करणारे मुले ही नॅशनल लेवल स्तरावर खेळतील अशी अपेक्षा नाना काटे यांनी यावेळी व्यक्त केली.
या पाहणीवेळी शहर अभियंता मकरंद निकम, स्मार्ट सिटीचे सहशहर अभियंता मनोज सेठीया, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत कोल्हे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता माणिक चव्हाण, उद्यान विभागाचे उपअभियंता गोसावी, शिर्के कंपनीचे लावंड, स्वामी, जाधव, शिखर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस श्रीकृष्ण कडुसकर, व इतर सहकारी उपस्थित होते.