पिंपरी (Pclive7.com):- “शारदा कॉम्प्लेक्स,पुणे” टेबल टेनिस हॉलमध्ये औद्योगिक क्रीडा संघटनेची ६१ वी टेबल टेनिस स्पर्धा आज (दि.०६) संपन्न झाली. या स्पर्धेत टाटा मोटर्स, बजाज ऑटो आकुर्डी, बजाज ऑटो चाकण, एसकेएफ, फॉरवीया, फ्लीटगार्ड फिल्टर्स, जेसीबी, सिग्मा इलेक्ट्रिकल्स, सँडविक एशिया, टीकेआयएल, प्राज इंडस्ट्रीज, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, एचईएमआरएल, ५१२ आर्मी, कॅरियर, एल अँड टी वगैरे १६ कंपन्यांच्या १५९ पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला होता. सदर स्पर्धा प्राज इंडस्ट्रीज लि तर्फे आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेच्या सुरुवातीला औद्योगिक क्रीडा संघटनेचे सचिव वसंत ठोंबरे यांनी प्रास्ताविक केले. तर नरेंद्र कदम यांनी संघटनेच्या कामाबद्दलची माहिती खेळाडूंना दिली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्राज इंडस्ट्रीज लिचे मार्केटिंग हेड उदय कुलकर्णी, औद्योगिक क्रीडा संघटनेचे नरेंद्र कदम, विजय हिंगे, वसंत ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभाचे संपूर्ण सूत्रसंचालन प्रदीप वाघ यांनी केले. हरी देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी जेष्ठ खेळाडू व स्पर्धेचे आयोजक अविनाश जोशी यांचा सत्कार करण्यात आला. याचवेळी खेळाडूंतर्फे संतोष माडीकंट व योगेश मुळे यांनी आपली मते व्यक्त केली व खेळाडूंकडून जास्तीत जास्त सहकार्य संघटनेस करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
पारितोषक वितरण प्रसंगी उदय कुलकर्णी (मार्केटिंग हेड, प्राज इंडस्ट्रीज लि) म्हणाले की, खेळाडूंची खेळाप्रती असलेली निष्ठा व प्रेम पाहून मला अतिशय आनंद होत आहे. विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करतो. याच वेळी औद्योगिक क्रीडा संघटनेचे नरेंद्र कदम, वसंत ठोंबरे, विजय हिंगे, हरी देशपांडे, प्रदीप वाघ, संतोष शिंदे, श्रीनिवास मोरे, राहुल कापसे, अविनाश जोशी, श्रीकांत केळकर उपस्थित होते. या स्पर्धेला नवोदित खेळाडूंचा व महिलांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. अशा स्पर्धा वर्षातून दोन वेळा आयोजित केल्या जाव्या अशी अपेक्षा अनेक नवोदित खेळाडूंनी व महिला खेळाडूंनी व्यक्त केली.
या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे निकाल खालील प्रमाणे..
पुरुष एकेरी गट (उपांत्य फेरी)
१) अमित पाटील (बजाज ऑटो आकुर्डी) विरुद्ध आर्यभ्रता रे(टाटा मोटर्स).८-११,११-१३,५-११. आर्यभ्रता रे (टाटा मोटर्स) विजयी
२) अमोल पाटील (टाटा मोटर्स) विरुद्ध प्रशांत कुमावत (टाटा मोटर्स).११-८,११-९,११-५. अमोल पाटील (टाटा मोटर्स) विजयी
पुरुष एकेरी प्रौढ गट (उपांत्य फेरी )
१) नितीन आपटे (फ्लीटगार्ड फिल्टर्स) विरुद्ध उदय गडीकर (कॅरियर ) .८-११,४-११,११-५,२-११. उदय गडीकर (कॅरियर) विजयी
२) विवेक फडणीस (एल अँड टी) विरुद्ध संतोष माडीकंट (एच्ईएमआरएल) .११-९,११-८,६-११,८-११,६-११. संतोष माडिकंट (एचईएमआरएल) विजयी
पुरुष दुहेरी गट (उपांत्य फेरी)
१)अमोल पाटील व साहेबराव सूर्यवंशी (टाटा मोटर्स ) विरुद्ध अमित पाटील व श्रेयस श्रॉफ (बजाज ऑटो आकुर्डी) .११-७,१२-१०, ११-७.
अमोल पाटील व साहेबराव सूर्यवंशी (टाटा मोटर्स) विजयी
२) प्रशांत कुमावत व आर्यभ्रता रे (टाटा मोटर्स) विरुद्ध मनीष मुंज व अनुपम नलावडे (टाटा मोटर्स) .११-६,७-११,११-४,६-११,९-११.
मनीष मुंज व अनुपम नलावडे (टाटा मोटर्स) विजयी
पुरुष एकेरी गट(अंतिम फेरी)
आर्यभ्रता रे (टाटा मोटर्स) विरुद्ध अमोल पाटील (टाटा मोटर्स) .९-११,४-११,२-११. अमोल पाटील विजेता. आर्यभ्रता रे उपविजेता
पुरुष एकेरी प्रौढ गट (अंतिम फेरी)
उदय गडीकर (कॅरियर) विरुद्ध संतोष माडिकंट (एचईएमआरएल) .१२-१४,४-११,७-११. संतोष माडिकंट विजेता. उदय गडीकर उपविजेता
महिला एकेरी गट (अंतिम फेरी)
कल्पिता कुलकर्णी (एचईएमआरएल) विरुद्ध नेहा बाविस्कर (टाटा मोटर्स). ६-११,११-९,११-९,११-५.
कल्पिता कुलकर्णी विजेती नेहा बाविस्कर उपविजेती
पुरुष दुहेरी गट (अंतिम फेरी)
अमोल पाटील व साहेबराव सूर्यवंशी (टाटा मोटर्स) विरुद्ध मनीष मुंज व अनुपम नलावडे (टाटा मोटर्स) . ८-११, ८-११, १३-११, ८-११.
मनीष मुंज व अनुपम नलावडे (टाटा मोटर्स) विजेते, अमोल पाटील व साहेबराव सूर्यवंशी (टाटा मोटर्स) .उपविजेते