पिंपरी (Pclive7.com):- अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त बुधवारी (दि.१८) शोभायात्रा व सभा आयोजित करण्यात आली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष दिलीप कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जितेंद्र कुलकर्णी, महिला सरचिटणीस संजिवनी पांडे, शहर चिटणीस महेश बारसावडे उपस्थित होते. चिंचवडगावातील मंगलमूर्तीवाडा येथून बुधवारी ( दि.१८) दुपारी तीन वाजता शोभायात्रेची सुरुवात होणार आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदारदेव महाराज यांच्या हस्ते शोभायात्रेची सुरुवात होईल. दुचाकी व चारचाकी वाहनांचा समावेश या शोभायात्रेत असणार आहे. ही शोभायात्रा मोरवाडी, मासुळकर कॉलनी, अजमेरा कॉलनी, नेहरुनगर, लांडेवाडीमार्गे भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहापर्यंत पोहचणार आहे.
शोभायात्रेनंतर सायंकाळी साडेपाच वाजता भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात जाहीर सभा होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उदयजी महाराज असणार आहेत तर, सभेचे प्रमुख वक्ते म्हणून खामगावचे मोहन कुलकर्णी असतील. या प्रसंगी भाजपचे राज्यसभेचे खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, नगरसेवक रवी लांडगे, राजेंद्र लांडगे, महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजीत देशपांडे, महिला सरचिटणीस संजीवनी पांडे, जितेंद्र कुलकर्णी, उद्योजक प्रसाद कुलकर्णी, सचिन पटवर्धन आदी उपस्थित राहणार आहेत.
या संदर्भात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष दिलीप कुलकर्णी म्हणाले, “परशुराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने या भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रथामध्ये भगवान परशुराम यांची प्रतिमा ठेवण्यात येणार आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांसह तरुण, महिला, पुरुष या शाभायात्रेत सहभागी होतील. तसेच, शोभायात्रेनंतर व्याख्याते मोहन कुलकर्णी यांचे ‘परशुराम: समज की गैरसमज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे”
विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मुग्धा कुलकर्णी, राजाभाऊ गोलांडे, एस. बी. पाटील, के. एम. बुक्तर, अरुण पवार, विवेक इनामदार, देविदास शिंदे, विजय लाटकर या मान्यवरांचा यावेळी महासंघातर्फे सत्कार करण्यात येणार आहे.






















Join Our Whatsapp Group