पिंपरी (Pclive7.com):- पुणे नेत्र सेवा प्रतिष्ठान, डॉ. डी वाय पाटील आयुर्वेद रुग्णालय, लायन्स क्लब ऑफ पुणे शताब्दी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याशिबिरात 45 रुग्णाच्या 75 डोळ्यांची तिरळेपणाची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. या शिबिराचे उदघाटन डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी या शिबिरासाठी राबणाऱ्या टीमचे कौतुक करून या शिबिराचा विश्वविक्रम व्हावा, याची नोंद गिनीज बुक मध्ये व्हावी.अशी इच्छा डॉ पी.डी पाटील यांनी व्यक्त केली. डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात संपन्न झालेल्या शिबिरात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांवर तिरळेणावर संपूर्ण मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
दोन दिवस या शिबिरात पुणे नेत्र सेवा प्रतिष्ठानचे प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. मधुसूदन झंवर, सचिव डॉ. राजेश पवार, डॉ. रमेश भागे,डॉ. ललित शहा, डॉ. सतिश देसाई (कार्याध्यक्ष),डॉ. वैभव बनारसे,डॉ. संपत पुंगलिया (खजिनदार) हे रुग्णसेवा दिली.
यावेळी लायन्स क्लब पुणे शताब्दीचे अध्यक्ष तेहमास भरूचा, माजी अध्यक्ष दीपक कुदळे, कैलाश मलिक, फ्रेडी गोदरेज, आर. के. शहा, डॉ. डी. वाय पाटील आयुर्वेद रुग्णालयाचे प्र. कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, प्र कुलगुरू डॉ स्मिता जाधव, प्राचार्य डॉ. गुणवंत येवला, वैद्यकीय अधीक्षक डॉ मयूर शिराळकर आदी उपस्थित होते.