मोशी (Pclive7.com):- किरकोळ कारणावरून मोशी येथे दोन गटांत हाणामारी झाली. त्याबाबत परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना ३१ डिसेंबरला रात्री घडली. विकास ज्ञानेश्वर सस्ते (वय ४४, रा. मोशी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गोल्या ऊर्फ साहिल कांबळे, अजिंक्य काशीराम नलवाड (१९, रा. मोशी), चंद्रकांत नलवाड, रोहन हळकुंटे, केपी आणि इतर दोन ते तीनजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास यांचा भाऊ विलास यांनी त्यांच्या बंगल्यासमोर थांबलेल्या तरुणांना ‘तुम्ही रस्त्यात का गोंधळ घालता’ असे विचारले. त्या कारणावरून संशयित आरोपींनी विलास यांना कोयत्याने, काठीने, विटांनी मारून गंभीर जखमी केले.
फिर्यादी यांची आई भांडण सोडविण्यासाठी गेली असता त्यांनाही मारहाण केली. याच्या परस्पर विरोधात चंद्रकांत मनोहर नलवाड (वय ४६, रा. मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विलास ऊर्फ भाऊ ज्ञानेश्वर सस्ते, विकास ज्ञानेश्वर सस्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी यांचा पुतण्या, त्यांच्या मित्राला आणि फिर्यादी यांना मारहाण केली. शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.