पिंपरी (Pclive7.com):- जागतिक रंगभूमीवर ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ करणारं ‘अलबत्या गलबत्या’ हे बालनाट्य पुणेकरांच्या भेटीला पुन्हा एकदा येत आहे. रविवार दि.१६ फेब्रुवारी, सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, (कोथरूड) पुणे येथे हे बालनाट्य पाहण्याची संधी मिळणार आहे.

तुफान लोकप्रियता मिळवणाऱ्या ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाने सलग ६ प्रयोग करत मराठी बालरंगभूमीच्या इतिहासात अनोखा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. पुणे शहरात बाल मनावर नाट्य संस्कार व्हावेत. नाटकाच्या आवडीतून विद्यार्थी कलाक्षेत्राकडे वळावेत. अभ्यासाचा तसेच मानसिक ताण तणाव कमी व्हावा, पालक आणि पाल्य यांच्यात सुसंवाद व्हावा हे या नाट्य प्रयोगाची ध्येय आणि उद्दिष्ट असून १०० टक्के मनोरंजनाची खात्री देण्यात आली आहे.

नुकतेच हे बालनाट्य पिंपरी चिंचवडकरांच्या भेटीला आले होते. यावेळी पिंपरी चिंचवडकरांनी हाऊसफुल प्रतिसाद दिला होता. चला तर मग पुणेकर वाट कसली बघतायं आजच संपर्क साधा आणि आपले तिकीट बुक करा.
फोन नं. 8799837727 / 9372243490
प्रयोग…
रविवार १६ फेब्रुवारी, सायं. ५ वा.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, (कोथरूड) पुणे






















Join Our Whatsapp Group