पिंपरी (Pclive7.com):- म्हाळुंगे येथील एका हुक्का पार्लरवर बावधन पोलिसांनी कारवाई केली. म्हाळुंगे येथील कांजी रेस्टोबार अँड ओमेज रेस्टॉरंट येथे शुक्रवारी (दि.१४) ही कारवाई केली.
ओंकार महेश खानेकर (२९, रा. सुतारदरा लेन नं. २७, शिवशक्तीनगर, कोथरुड, पुणे), निनाथ दिलीप पाडाळे (रा. बाणेर, पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस हवालदार विक्रांत चव्हाण यांनी याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात फियीद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निनाथ पाडाळे हा म्हाळुंगे येथील कांजी रेस्टोबार अँड ओमेज रेस्टॉरंट या हॉटेलचा मालक आहे. तर ओंकार खानेकर हा हुक्का बनवतो. कांजी रेस्टोबार अँड ओमेज रेस्टॉरंट या हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, बावधन पोलिसांनी कारवाई केली.

या कारवाईत संशयित निनाथ आणि ओंकार यांनी हॉटेलमध्ये विनापरवाना बेकायदा चार हजार ५०० रुपयांचे हुक्कापॉट व हुक्का तंबाखूजन्य फ्लेवर विक्रीसाठी बाळगताला मिळून आले. तसेच हुक्का पिण्याचा वेगळा झोन न करता ग्राहकांची गदी करून त्यांना हुक्का पिण्यास व जेवणास एकत्र बसविताना मिळून आले.
























Join Our Whatsapp Group