पिंपरी (Pclive7.com):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे कार्यकर्ते आपल्या नेत्यांप्रती असलेल्या प्रेमाचे वेगवेगळ्या पद्धतीने दर्शन घडवत असतात. पिंपरी विधानसभेचे आरपीआय अध्यक्षदादा शिरोळे यांनी त्यांच्या रक्ताचा वापर करून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे एक चित्र तयार केले.
हा अनोखा सन्मान देण्यासाठी दादा शिरोळे आणि कार्यकर्त्यांनी मंत्री रामदास आठवले यांची पिंपरी येथे भेट घेतली आणि त्यांना स्वतःच्या रक्ताने तयार केलेले चित्र सुपूर्द केले. या भेटीदरम्यान, आठवले यांनी कार्यकर्त्यांच्या या अद्वितीय कृतीचे कौतुक केले आणि आभार मानले.
याप्रसंगी आरपीआय पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या भेटीमुळे कार्यकर्त्यांमधील जोष आणि उत्साह अधिक वाढला असून, पक्षनिष्ठेचे अनोखे उदाहरण पिंपरी-चिंचवडमध्ये पाहायला मिळाले.






















Join Our Whatsapp Group