पिंपरी (Pclive7.com):- फुगेवाडी येथील नदीपात्रात राडारोडा टाकणारा टेम्पो सुरक्षारक्षकाने पकडून दिला आहे. सुरक्षारक्षक विनोद शिंदे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या भरारी पथकाने हा टेम्पो जप्त करत कारवाई केली आहे.
फुगेवाडी येथील हिंदू स्मशानभूमीत सैनिक कंपनीचे सुरक्षारक्षक विनोद शिंदे हे ड्युटीवर होते. त्यावेळेस एका मोठ्या टेम्पो मधून कचरा, राडारोडा नदीच्या पात्रात टाकण्यात येत होता. त्यावेळेस विनोद शिंदे यांनी त्या टेम्पो चालकाला विचारणा केली, तुम्ही कचरा राडारोडा नदीच्या पात्रात का टाकता? त्यावेळेस त्या टेम्पोतील तिघा चौघांनी त्यांना शिवीगाळ केली, दमदाटीही केली. विनोद शिंदे यांनी याबाबत आरोग्य विभागाकडे तक्रार केली. पर्यावरण विभागाने तात्काळ फ्लाईंग स्क्वाड घटनास्थळी पाठवला. त्यानंतर या पथकाने हा राडारोडा टाकणारा टेम्पो जप्त केला आहे.
विनोद शिंदे यांच्या चांगल्या कार्यामुळे आरोग्य विभाग व युवासेना, शिवसेना शाखेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळेस आरोग्य अधिकारी सचिन जाधव, मुकादम सतीश घोलप, प्रकाश खंडागळे, युवासेना पिंपरी चिंचवड शहर संघटक निलेश हाके व शिवसैनिक उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group