आळंदी (Pclive7.com):- 15 वर्षीय विद्यार्थ्यांकडे संगीत विषयाच्या शिक्षकाने शरीर सुखाची मागणी केली. घाबरलेल्या विद्यार्थ्याने संस्थाचालकाला ही बाब सांगितली, मात्र त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही. अखेर विद्यार्थ्याने दिघी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
शिक्षकासह संस्था चालकावर ही गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आळंदी आणि परिसरात वारकरी शिक्षण संस्थांमध्ये अनैसर्गिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, म्हणूनचं इथल्या खाजगी शिक्षण संस्था बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.
जानेवारीपासून हा तिसरा तर आजपर्यंत सात गुन्हे दाखल झाले आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सुद्धा या प्रकरणाला गांभीर्यानं घेतलं आहे. ४८ तासांमध्ये बेकायदा/अनधिकृत खाजगी वारकरी संस्था बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी वीस पथकं नेमून आळंदीत सर्वेक्षणही झालं. मात्र अद्याप किती संस्था बेकायदा/अनधिकृत आहेत. हे समोर आलंच नाही.