पिंपरी (Pclive7.com):- अदानी यांच्या कंपनीला दिलेल्या स्मार्ट मीटर व महावितरणच्या खाजगीकरणाला सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी विरोध दर्शवला आहे. महावितरणकडून ग्राहकांच्या माथी जबरदस्तीने स्मार्ट प्रीपेड मीटर लादले जात आहे. या निषेधार्थ पिंपरी येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले. ग्राहकाची परवानगी न घेता त्यांच्या घरी स्मार्ट मीटर बसवले जात असून, अनेक ग्राहक घरी नसतानाही जुन्या मीटरची तोडफोड करून नवीन मीटर बसवण्याचे प्रकार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महावितरणच्या या धोरणाविरोधात दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, वीज कायदा २००३ च्या कलम ५५ नुसार ग्राहकांना त्यांच्या मीटर निवडण्याचा संपूर्ण हक्क आहे. मात्र महावितरणने हा कायदा डावलून जबरदस्तीने स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यास सुरुवात केली आहे. ग्राहक घरी नसताना जर मीटर बदलले गेले आणि जुन्या मीटरचा ठिकाणी लागत नसेल, तर यांस जबाबदार असलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आलेला आहे. महावितरणकडून सुरू असलेल्या या प्रकाराबाबत ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होत आहे, असेही युवा सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
महावितरणचे खाजगीकरण झाले तर महावितरणमध्ये काम करणारे कर्मचारी यांना आता ज्या सरकारी योजना अथवा सवलती, फायदे घेता येणार नाही. कामाचा ताण वाढून कमी पगारात नोकरी करावी लागेल. यासाठी महावितरणचे खाजगीकरण होऊ नये ही विनंती. पिंपरीतील सामाजिक कार्यकर्ता सुहास कुदळे हा स्मार्ट प्रीपेड मीटरला विरोध करणारा पहिला नागरिक ठरला आहेत. भविष्यात या संदर्भात स्थानिक नागरिक, व्यापारी वर्ग तसेच पिंपरी परिसरातील सर्व नागरिकांची बैठक घेऊन जनआंदोलन कसे उभे करता येईल त्यावर चर्चा केली जाईल असे सुहास कुदळे यांनी निवेदनात म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group