चिंचवड (Pclive7.com):- रोटरी क्लब उद्योगनगरी पिंपरीच्या वतीने महिला दिनानिमित्त राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या प्रा. शिल्पागौरी गणपुले, योगगुरु मनाली देव यांना रोटरी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी प्रांतपाल मंजू फडके, उपप्रांपल जगमोहन सिंग,क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेजवळ, सचिव वैभव गवळी, धनंजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी, पिंपरीच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर निगडी प्राधिकरण येथील फेस डेंटल इंटरनॅशनल क्लीनिक मध्ये आयोजित कारण्यात आले होते. यावेळी दंत चिकित्सक डॉ. प्रकाश पाटील व डॉ. गौरी पाटील, निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलचे संचालक डॉ. निलेश लोंढे व डॉ. सारिका लोंढे तसेंच नांदेडकर हॉस्पिटल चे डॉ. विष्णू नांदेडकर यांनी रुग्णसेवा दिली. या शिबिरामध्ये जवळपास १०० महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.






















Join Our Whatsapp Group