पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोशिएनच्या आज झालेल्या बैठकीमध्ये असोशिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांनी वसंत कोकणे यांची उपाध्यक्षपदी निवड केली असल्याचे जाहीर केले. याप्रसंगी असोशिएशनचे सचिव राजू कोतवाल, खजिनदार संजय शिंदे, विजय कोतवाल आदी उपस्थित होते.
यावेळी पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोशिएशनच्यावतीने पिंपरी चिंचवड प्रिमिअर लिग स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. यासाठी पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व क्रिकेट क्लबचे व्यवस्थापकांबरोबर सोमवार (दि.१७) सांयकाळी ६ वाजता हॉटेल मल्हार, प्राधिकरण, निगडी येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
तरी सदर बैठकीस पिंपरी चिंचवड परिसरातील क्रिकेट क्लबच्या व्यवस्थापकांनी उपस्थित राहवे असे आवाहन अध्यक्ष जगदीश शेट्टी यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group